जोडीदार …
घाई होती तिची…
कंबरेला लटकवलेल्या
बटव्यातून काढलेली,
चुरगळलेली .,
जरा जुनी अशी ,
थोडी मळलेलीच
एक शंभराची नोट…
त्याच्या हातावर ठेवण्याची
पण……
आभाळासारखाच होता तो शेवटी
हसत हसत म्हणाला तिला,
खरंच ..
गरज आहे का गं तुला
मी असताना
इतकी काळजी करण्याची?
-प्रियांका शेंडगे