कृष्ण……❤️
निळे जांभळे हिरवट सोनेरी
कुरळ्या केसांत खोवलेले मोरपीस मखमली
नीलवर्णी,मनमोहक अनावर खट्याळ
मनुष्य रूपात जन्मला एक दैवी किमयागार
कमलादलापरी निर्लेप षड्रिपुंच्या वासनांपासूनी
त्रिकालदर्शी तरी अलीप्त सारे काही जाणुनी
चौदा विद्यांचा स्वामी चौंसष्ट कलांचा अधिकारी
तोच सुर ,तोच संगीत स्वर्गीय त्याची वेणु-वाणी
तो गुणी पुत्र बंधू ,पती आणि पिताही
तो सखा ,सवंगडी आणि दुर्लभ सारथीही
आईसाठी खट्याळ बाळ
अधर्मींचा होतो काळ
तो न्यायाचा,धर्मचा रक्षक
युगायुगांचा मार्गदर्शक
तो बंदिवासात जन्मलेला
विमुक्त नभाखाली अखेर विसावलेला
तुझ्यामाझ्या धमण्यात सळसळणारा
कालही,आजही आणि उद्याही असणारा
कृष्ण……❤️
-प्रियांका शेंडगे
Filters