श्रीकृष्ण जन्माष्टमी ❤️
कृष्ण……❤️ निळे जांभळे हिरवट सोनेरी कुरळ्या केसांत खोवलेले मोरपीस मखमली नीलवर्णी,मनमोहक अनावर खट्याळ मनुष्य रूपात जन्मला एक दैवी किमयागार कमलादलापरी निर्लेप षड्रिपुंच्या वासनांपासूनी त्रिकालदर्शी तरी अलीप्त सारे काही जाणुनी चौदा विद्यांचा स्वामी चौंसष्ट कलांचा अधिकारी तोच सुर ,तोच संगीत स्वर्गीय त्याची वेणु-वाणी तो गुणी पुत्र बंधू ,पती आणि पिताही तो सखा ,सवंगडी आणि दुर्लभ सारथीही […]
जोडीदार …
जोडीदार … घाई होती तिची… कंबरेला लटकवलेल्या बटव्यातून काढलेली, चुरगळलेली ., जरा जुनी अशी , थोडी मळलेलीच एक शंभराची नोट… त्याच्या हातावर ठेवण्याची पण…… आभाळासारखाच होता तो शेवटी हसत हसत म्हणाला तिला, खरंच .. गरज आहे का गं तुला मी असताना इतकी काळजी करण्याची? -प्रियांका शेंडगे
